औरंगाबाद- मावळत्या वर्षाला निरोप देत असताना प्रत्येक जन नवर्षांसाठी विशेष संकल्प करतात. यावर्षी मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पक्ष एमआयएम व अन्य छोटे- मोठे राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. आज कोणताही पक्ष स्वबळावर निवडणूक जिंकू शकत नाही. म्हणून सर्वच पक्षाचे नेते युती आघाडी करून जुळवा जुळवीला महत्त्व देणार आहेत. हे राजकीय हालचालीवरून दिसत आहे.
देशात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे
दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत. २०१४ मध्ये भाजपने मित्रपक्षासह राष्ट्रीय आघाडीच्या माध्यमातून
बहुमतापेक्षा अधिक जागा मिळविल्या. एकट्या भाजपला २८३ जागा मिळाल्या होत्या. गतवेळेस देशात भाजपची लाट होती. पण
यंदा मात्र मोदीची जादू ओसरत चालल्याचे चित्र आहे. भाजपच्या मंडळीला ही त्याची
जाणीव आहे. तसेच त्यांचे बरेच मित्रपक्ष एनडीएला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडले.
त्यामुळे भाजप पुढे नवीन मित्र जोडण्याचे व आहेत. त्यांना समाधानी ठेवण्याचे
आव्हान आहे. तर गत निवडणुकीत बहुमतावरून ४४ जागांवर घसरण झालेल्या काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल
झाल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकांचे प्रश्न समजून ते उचलून धरणे त्यामुळे
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन
राज्यात काँग्रेसला यश आले.
काँग्रेस पक्षासह प्रत्येक
राज्यातील स्थानिक राजकीय पक्षाची जुळवाजुळवी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करीत
आहेत. तर राहुल गांधीचे नेतृत्व मान्य नसलेली मंडळी काँग्रेसच्या संयुक्त लोकशाही
आघाडीला शह देत तिसरी आघाडी निर्माण करीत आहेत. काँग्रेस आणि भाजपला जुळवाजुळवी
करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. मित्रपक्षांनी जरी अव्वाच्या सव्वा मागण्या
केल्या असल्या तरी त्यांना गोंगारून आघाड्या करण्याचे आव्हान सर्वच राजकीय
पक्षापुढे उभे राहिले आहे.
राज्यात मनसे, वंचित आघाडीला
महत्त्व
राज्याची
परिस्थिती पाहता सत्ताधारी सेना- भाजपचे युतीबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट आहे. तर
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर आघाडी करून मित्रपक्षांची चार जागांवर
बोळवण करण्याचा निर्णय घेतल्याने मित्र पक्ष अस्वस्थ आहेत. तर भारिप बहुजन महासंघ
एमआयएम युती करून अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी काँग्रेस- राष्ट्रवादीची
डोकेदुखी ठरणार आहे. तर राज ठाकरे यांची मनसेही भाजप- शिवसेनेला तापदायक आहे.